ताज्या बातम्या
Pune : पुण्यात खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड
विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.
चंद्रशेखर भांगे, पुणे
विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. यातच पुण्यात खासगी वाहनात कोट्यवधीची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
खेड शिवापूरच्या परिसरात खासगी वाहनातून ही मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. या वाहनामध्ये पाच कोटी रुपयांची रोकड पोलिसांना आढळून आली आहे. खेड शिवापूरच्या परिसरात ही रक्कम आढळल्याची माहिती मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी करण्यात आली असतानाच पुणे जिल्ह्यातील भोरच्याजवळ राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही रोकड जप्त करण्यात आली.
संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून इन्कम टॅक्स व संबंधित विभागांना या संदर्भाची माहिती देण्यात आली आहे.