पुणे पोलिसांनी घातपाताचा मोठा कट उधळला; शस्त्रसाठ्यासह आरोपी ताब्यात

पुणे पोलिसांनी घातपाताचा मोठा कट उधळला; शस्त्रसाठ्यासह आरोपी ताब्यात

एअरपोर्ट जवळील वन विभागाच्या परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांना पाहून आरोपी पळून जात होता. यावेळी पोलिसांनी पाठलाग करत आरोपी राहुल गवळीला ताब्यात घेतलं आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

पुणे |चंद्रशेखर भांगे : पुण्यात मोठा घात-पात करण्याचा डाव विमानतळ पोलिसांनी उधळून लावला आहे. पाच पिस्टलसह 14 राउंडचा मोठा शस्त्रसाठा एअरपोर्टच्या (Pune Airport) परिसरातून पोलिसांनी जप्त केला आहे. एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राहुल गोपाल गवळी असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे. एअरपोर्ट जवळील वन विभागाच्या परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांना पाहून आरोपी पळून जात होता. यावेळी पोलिसांनी (Pune Police) पाठलाग करत आरोपी राहुल गवळीला ताब्यात घेतलं आहे.राहुल गवळीवर राज्यात विविध पोलीस स्थानकात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. राहुल गवळी हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील चोपड्याचा (Chopda, Jalgaon) रहिवासी असून, पुणे शहरात घातपातासाठीच तो आला होता अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलीस निरीक्षक मंगेश जगताप आणि उपनिरीक्षक रवींद्र डावरे यांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

पुणे पोलिसांनी घातपाताचा मोठा कट उधळला; शस्त्रसाठ्यासह आरोपी ताब्यात
"प्रादेशिक अस्मिता चिरडण्याचं काम भाजपकडून होतंय, संजय राऊतांचा आम्हाला अभिमान"
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com