Ashadhi wari 2023 : पुण्यातील पालखी मार्गावर करण्यात आले महत्त्वाचे बदल, कोणते रस्ते सुरु, कोणते बंद? पाहा

Ashadhi wari 2023 : पुण्यातील पालखी मार्गावर करण्यात आले महत्त्वाचे बदल, कोणते रस्ते सुरु, कोणते बंद? पाहा

संत तुकाराम महाराजांची पालखी आज सकाळी 7 वाजता पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

संत तुकाराम महाराजांची पालखी आज सकाळी 7 वाजता पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे. या पालखी मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वीपासूनच वारकरी आळंदीत दाखल व्हायला सुरुवात झाली होती.

पालखी सोहळ्यातील भाविकांच्या गर्दीचे नियोजन, अनुचित घटना रोखण्यासाठी मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.

वाहतुकीस बंद असणारे रस्ते- पर्यायी मार्ग

शिवाजी रस्ता (गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे चौक) पर्यायी मार्ग- कुंभार वेस, मालधक्का चौक, आरटीओ चौक, जहांगीर हॉस्पिटल, बंडगार्डन रस्ता.

टिळक चौक ते वीर चापेकर चौक, पर्यायी मार्ग- शास्त्री रस्ता, म्हात्रे पूल.

लक्ष्मी रस्ता (बेलबाग चौक ते टिळक चौक), पर्यायी मार्ग- शिवाजी रस्ता, हिराबाग टिळक रस्ता, शास्त्री रस्ता.

गणेशखिंड रस्ता पर्यायी मार्ग- रेंजहिल्स-खडकी पोलीस ठाणे, पोल्ट्री चौक, जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि रेंजहिल्स, सेनापती बापट रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता.

फर्ग्युसन रस्ता पर्यायी मार्ग- कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, रेंजहिल्स.

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी रस्ते बंद

नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिर येथे श्री तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी असणार आहे.

या भागातील रस्ते सोमवारी (12 जून) दुपारी 12 नंतर वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com