‘मनसे’च्या गांधीगिरीनंतर पुणे-नाशिक महामार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरूवात
आदेश वाकळे, संगमनेर
नाशिक राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले होते.त्यामुळे अपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमानावर वाढले होते. याबाबत संबंधित प्रशासनाला जाग यावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोके यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये गांधीगिरी करत वृक्षारोपण आणि माती टाकून खड्डे बुजवले होते. त्यानंतर महामार्ग प्रशासनाला जाग आल्याने आजपासुन पुणे-नाशिक महामार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरूवात केली आहे यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
नाशिक-पुणे या महामार्गावरून दररोज लाखो प्रवासी व मालवाहतूक वाहनांची ये - जा होत असते मात्र पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता त्यामुळे संबंधित विभागाने तत्काळ हे खड्डे बुजवावेत . म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या खड्ड्यांमध्ये गांधीगिरी करीत वृक्षारोपण आणि माती टाकून खड्डे बुजवत तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोके यांनी दिला होता . त्यानंतर पाऊस उघडल्याने संबंधित विभागाने आज पासून खड्डे बुजविण्यास सुरूवात केली आहे. यामुळे वाहनचालक आणि प्रवासी हे समाधान व्यक्त करत आहेत.