ताज्या बातम्या
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; मेट्रोची स्वारगेटपर्यंतची सेवा गणेशोत्सवाच्या आधी सुरू होण्याची शक्यता
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
अमोल धर्माधिकारी, पुणे
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मेट्रोची स्वारगेटपर्यंतची सेवा गणेशोत्सवाच्या आधी सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा मार्ग 3.64 किलोमीटरचा असून जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मार्गावर बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट अशी तीन स्थानके असणार आहेत.
मेट्रो मार्गाचे काम 95 टक्के पूर्ण झाले असून, जुलै अखेरीस ते पूर्ण होणार असल्याची माहिती मिळत आहे. गणेशोत्सवाच्या आधी या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याचे मेट्रोने नियोजन केले असल्याचे समजते. पुण्यामध्ये लवकरच भुयारी मेट्रो धावणार आहे. या भुयारी मार्गावर मेट्रोची चाचणी फेब्रुवारीमध्ये घेण्यात आली होती.