Pune : लोहगाव-वाघोली रस्त्यावरील कर्मभूमी नगरजवळ पाण्यात पडून युवकाचा मृत्यू
पुणे | चंद्रशेखर भांगे : पुण्यातील लोहगाव वाघोली रस्त्यावरील कर्मभूमी नगरजवळ पाण्यात पडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास घरी जात असताना सयाजी जगन्नाथ वाघमारे (वय 25, रा. सुभाष काळभोर यांचे भाडेकरी, दत्त मंदिरासमोर, लोहगाव. मूळ रा. पंढरपूर) यांचा कर्मभूमी नगर जवळ साचलेल्या पाण्यात पडून मृत्यू झाला. वाघमारे हे दुचाकी वरून येत असताना दुचाकी पाण्यात पडली आणि ते पाण्यात बुडाले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. वाघमारे हे मूळचे पंढरपूर येथील असून, ते काळभोर यांच्या घरी भाड्याने राहत होते. ते डम्पर चालवायचे काम करत होते. ही घटना घडल्यानंतर आता आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागं होणार असा सवाल नागरिकांकडू उपस्थित केला जातोय. गेल्या आठ दिवसांपासून या भागात पाणी साचून आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी विनंती नागरिकांनी केली आहे.
रास्ता रोकोमध्ये मोहनराव शिंदे, दिपक काळुराम खांदवे, स्वप्नील खांदवे, मदन मोहन ठाकूर, विनायक शिंदे, गणेश वाघे, उद्धव जाधव, बालू वरपे, अक्षय शिंदे, निलेश खूने, कुंदन पाटील, प्रेम चौधरी यासह लोहगाव-वाघोली नागरिक विकास मंचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. दिपक खांदवे म्हणाले, महापालिका प्रशासन आणखी किती बळी गेल्यानंतर जागे होणार आहे. रोज याठिकाणी अपघात होत असून घरात, दुकानात पाणी जातंय. वाहतूक कोंडी होत असल्यानं शाळेच्या स्कुल बसला शाळेत पोहचयाला उशीर होत आहे. प्रशासनाने या गंभीर समस्याकडे तातडीने लक्ष द्यावे.