पुणे हिट अँण्ड रन प्रकरण; अल्पवयीन आरोपीवर दाखल केलेल्या गुन्ह्यात नवीन कलमाची वाढ

पुणे हिट अँण्ड रन प्रकरण; अल्पवयीन आरोपीवर दाखल केलेल्या गुन्ह्यात नवीन कलमाची वाढ

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.

याच पार्श्वभूमीवर आता अल्पवयीन आरोपीवर दाखल केलेल्या गुन्ह्यात नवीन कलमाची वाढ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अल्पवयीन आरोपीवर 185 कलमांतर्गत नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला जुवेनाईल न्यायालयासमोर हजर केलं जाणार असून मद्यप्राशन करुन कार चालवल्याबद्दल नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com