ताज्या बातम्या
पुणे हिट अँड रन प्रकरण: आरोपी अजय तावरेची कारागृहात चौकशी होणार
पुणे हिट अँड रन प्रकरणात आता आरोपी अजय तावरेची कारागृहात चौकशी होणार असल्याची माहिती मिळत आहे.
अमोल धर्माधिकारी, पुणे
पुणे हिट अँड रन प्रकरणात आता आरोपी अजय तावरेची कारागृहात चौकशी होणार असल्याची माहिती मिळत आहे. डॉ. तावरेला रक्तनमुने बदल प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेला चौकशी करण्यास कोर्टाने परवानगी दिली असून आरोपी अजय तावरेची कारागृहात करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांकडून पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.
डॉ. तावरे याची येरवडा कारागृहात जाऊन चौकशी करण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती गुन्हे शाखेने न्यायालयाकडे केली होती.