पुणे हिट अँड रन प्रकरण; एआयद्वारे जिवंत करणार अपघाताची घटना

पुणे हिट अँड रन प्रकरण; एआयद्वारे जिवंत करणार अपघाताची घटना

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.

याच पार्श्वभूमीवर आता या अपघाताची घटना ही एआयद्वारे जिवंत करणार असल्याची माहिती मिळत आहे. डिजिटल पुराव्यासाठी पोलिसांचा हा मोठा निर्णय आहे. अपघातातील दोषींना कडक शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांकडून तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर भर देण्यात आला आहे.

यासाठी एआयमधील तज्ज्ञांसह वाहन आणि रस्ते वाहतुकीशी संबंधित केंद्रीय संस्थांची मदत घेतली जाणार आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्स द्वारे अपघाताची घटना जिवंत करणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com