ताज्या बातम्या
Pune : पुण्यात थंडीचा कडाका वाढला, किमान तापमान 13 अंश सेल्सिअस
शहरातील किमान तापमानात झपाट्याने घट
थोडक्यात
पुण्यात थंडीचा कडाका वाढला
शहरातील किमान तापमानात झपाट्याने घट
13 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद
पुण्यात थंडीचा कडाका वाढल्याचे पाहायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळे तयार होण्याचा अति उच्च काळ संपलेला असल्याची माहिती मिळत असून चक्रीवादळाचा काळ संपल्यामुळे हिवाळ्याला पोषक स्थिती निर्माण झाली आहे.
शहरातील किमान तापमानात झपाट्याने घट होत असून 13 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुढील तीन महिने चांगल्या थंडीचे असणार आहेत.
थंडीसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत चांगली थंडी पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.