वर्धा नदीचं पाणी पुलगावात शिरलं; आमदार रणजित कांबळे यांचे प्रशासनाला तातडीनं मदत देण्याचे निर्देश
वर्धा | भूपेश बारंगे : वर्ध्यातील पुलगाव मागील काही दिवसापासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सोबतच निम्न वर्धा प्रकल्पातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे. यामुळे पुलगाव येथील बुरड मोहल्ला (गारोडी मोहल्ला) परिसरात वर्धा नदीचे पाणी शिरले आहे.
परिसरातील अनेक घरे पाण्याखाली आली असुन पाण्याच्या पातळीत सतत वाढत होत आहे. यामुळे तातडीने या नागरीकांना सुरक्षीत स्थळी तातडीने स्थानांतरीत करुन त्यांच्या राहण्या व जेवणाची व्यवस्था करण्यात यावी. सोबतच ज्या नागरीकांची घरे पाण्याखाली आलो आहे. त्यांचे पंचनामे करून खावटी योजना व इतर मदत करण्यात यावी.असे निर्देश आमदार रणजित कांबळे यांनी प्रशासनाला मंगळवारी लेखी पत्रद्वारे दिले आहे. या परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने तेथील नागरिकांना नगरपालिकेच्या शाळेत प्रशासनाने स्थानानंतरीत केले आहे.देवळीचे तहसीलदार राजेश सरवदे,नप मुख्याधिकारी सतीश शेवदे, नायब तहसीलदार अजय झिले यांनी परिसराची पाहणी केलीय.