Badlapur Railway Station: बदलापूर रेल्वे स्थानकावर झालेल्या ठिय्या आंदोलनामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम
बदलापूरमधील एका प्रसिद्ध शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला आहे. सफाई कामगाराने अत्याचार केल्याची संतपाजनक घटना समोर आली आहे. तर लैंगिक अत्याचाराच्या 4 दिवसानंतर प्रशासनाला जाग आल्याचं पाहायला मिळत आहे.
बदलापूर रेल्वे स्थानकावरही शेकडो आंदोलक जमा झाले असून त्यांनी सर्व रेल्वे रोखून धरल्या आहेत. बदलापूर रेल्वे स्थानकावर झालेल्या ठिय्या आंदोलनामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला आहे.
मध्य रेल्वेने अंबरनाथ ते कर्जत दरम्यान 30 लोकल फेऱ्या रद्द केल्या असून लांब पल्ल्याच्या 12 गाड्या परावर्तित केल्या आहेत. याशिवाय 55 ज्यादा बसेस कल्याणवरुन कर्जतला जाण्यासाठी तैनात केल्या आहेत. बदलापुरातील आंदोलनामुळे मध्य रेल्वेची एक्सप्रेस सेवा विस्कळीत झाली आहे. सीएमएमटी -भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस, सीएमएमटी-हैदराबाद एक्सप्रेस, श्रीगंगानगर-तिरुचिरापल्ली एक्सप्रेस, उदयपूर सिटी- म्हैसूर एक्सप्रेस या रेल्वेगाड्या पनवेलमार्गे वळवल्या आहेत. मध्य रेल्वेवरील कल्याण-कर्जत आणि अंबरनाथवरून बदलापूरकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गाच्या रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आले होते.