पुण्यात पोलीस भरती विरोधात सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन

पुण्यात पोलीस भरती विरोधात सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन

राज्यात आजपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

चंद्रशेखर भांगे, पुणे

राज्यात आजपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु होत आहे. 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. तसेच कारागृह विभागातील भरतीसाठी 1हजार 800 पदासाठी 3 लाख 72 हजारहून अधिक अर्ज आले असल्याची माहिती मिळत आहे.

यातच आता पुण्यात पोलीस भरती विरोधात सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन करण्यात येत आहे. सरकारविरोधात दंडवत घालत विद्यार्थी आंदोलन करत आहेत. पोलीस भरतीला वय वाढवून मिळावे या मागणीसाठी पुण्यात रात्रभर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे.

सन 20-22या वर्षाची पोलीस भरती 2024 मध्ये घेत आहे. 2022 या वर्षातील पात्र विद्यार्थ्यांना या भरतीत पासून वंचित राहावे लागत आहे. यासाठी वय वाढवून मिळावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com