Eknath Shinde
Eknath ShindeTeam Lokshahi

बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांचे संरक्षण काढले, एकनाथ शिंदे आक्रमक

राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात एकमेकांवर आरोप-प्रत्योरोप करण्यात येत आहे. आत एकनाथ शिंदे आमदारांच्या गटातील संरक्षण काढून घेतल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक टि्वट करुन सरकारला ईशारा देण्यात आला आहे.

शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आणि संबंध महाराष्ट्र हादरला. त्यांच्यांसोबत 45 पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा केला जात आहे. त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांच्या कुटुंबियांचे संसक्षण राज्य सरकारने काढून घेतले आहे. यासंदर्भात एकनाथ शिंदे आक्रमक झाले आहे.

Eknath Shinde
शिवसेना आक्रमक; एकनाथ शिंदेंसह 15 बंडखोरांवर होणार कारवाई?

एकनाथ शिंदे यांनी एक ट्वीट करत सरकारला इशारा दिला आहे. राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असा थेट इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांकडून शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते, असेही ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. दरम्यान, शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना आज नोटीस पाठविण्यात येणार आहे. 27 जूनपासून विधानसभा उपाध्यक्षांपुढं सुनावणी होणार आहे. बंडखोरांच्या निलंबनाबाबत कायदेशीर लढाई सुरु झाल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

Eknath Shinde
शिंदेच्या टि्वटमुळे टि्वस्ट : शिवसेना कोणाची? शिंदेची की उद्धव ठाकरेंची?
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com