प्राध्यापकाची वर्धा नदीत उडी घेवून आत्महत्या, १७ तारखेला होतं लग्न
भूपेश बारंगे |वर्धा : नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील नामांकित महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक विनोद बागवाले यांनी वर्ध्यातील तळेगांव नजीकच्या वर्धा नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सध्या वर्धा नदी पात्रात अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे त्यामुळे प्राध्यापक विनोद केशव बागवाले हे अद्यापही बेपत्ता असून त्याचा शोधकार्य सुरू आहे.
नागपूर अमरावती महामार्गावरील वर्धा नदीच्या पुलावर कार उभी करून प्राध्यापकांने उडी घेतली. नदीपात्रात उडी घेत असल्याचे अनेकांना दिसताच त्यांनी तळेगांव पोलिसांना माहिती दिली. उडी घेतलेल्या प्राध्यापक अद्यापही बेपत्ता आहे. त्याच्या शोध घेण्यासाठी रसेक्यु पथक दाखल झाले आहे. वर्धा नदीपात्रात पाण्याची पातळी वाढ झाल्याने अजूनपर्यंत बेपत्ता प्राध्यापक मिळून आला नाही. या प्राध्यापकांचे तीन दिवसानंतर विवाह होणार होते. मात्र त्याच्या आत्महत्यांचे अद्यापही कारण कळू शकले नाही.