Priyanka Gandhi : प्रियंका गांधींची तब्येत बिघडली! भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्यापूर्वीच रुग्णालयात दाखल
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी स्वतः एक्सवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. तसेच त्या प्रकृतीच्या कारणास्तव शुक्रवारी 'भारत जोडो न्याय यात्रे'मध्ये सहभागी होऊ शकणार नाहीयेत. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार त्या आज संध्याकाळी उत्तर प्रदेशातील चंदौली येथे काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार होत्या. मात्र त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रियंका गांधी यांचं ट्विट, 'मी 'भारत जोडो न्याय यात्रा' उत्तर प्रदेशात पोहोचण्याची आतुरतेने वाट पाहत होते, पण आजारपणामुळे मला आजच रुग्णालयात दाखल करावे लागले. माझी तब्येत थोडी सुधारली की मी या यात्रेत सामील होईन. तोपर्यंत चंदौली-बनारसला पोहोचणाऱ्या सर्व यात्रेकरूना, प्रवासाची तयारी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील माझ्या सहकाऱ्यांना आणि माझ्या प्रिय भावाला मी शुभेच्छा देते.