पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केदारनाथ दौरा; पेहरावाने वेधलं लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथच्या दौऱ्यावर आहेत. केदारनाथचे दर्शन घेत त्यांनी रुद्राभिषेक केला. सुमारे अर्धा तास प्रार्थना केल्यानंतर, पंतप्रधान मोदी रात्री 9 वाजता केदारनाथ रोपवे प्रकल्पाची पायाभरणी केली. यानंतर पंतप्रधान मोदी मंदाकिनी आस्था पथ आणि सरस्वती आस्था पथावर सुरू असलेल्या विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. हेमकुंड रोप-वे गोविंदघाट आणि हेमकुंड साहिब या दोन ठिकाणांना जोडणार आहे. हा रोप-वे 12.4 किमी लांबीचा असणार आहे. सध्या या दोन ठिकाणादरम्यानच्या प्रवासाला एक दिवसाचा कालावधी लागतो. रोप-वे नंतर हा कालावधी 45 मिनिटांवर येणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या पेहरावाची मोठी चर्चा सुरू झाली. पंतप्रधान मोदींनी केदारनाथसाठी हिमाचल प्रदेशमधील चंबातील महिलांनी दिलेला पेहराव परिधान केला होता. त्याशिवाय, त्यांनी हिमाचली टोपी परिधान केली होती. पंतप्रधान मोदी यांनी परिधान केलेल्या पेहरावाला 'चोल डोरा' असं म्हणतात. हा पोषाख नुकत्याच हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यादरम्यान महिलांनी पंतप्रधानांना भेट म्हणून दिला होता.
केदारनाथ धाममध्ये पूजा आणि इतर सर्व कार्यक्रम केल्यानंतर पंतप्रधान मोदी हेलिकॉप्टरने थेट बद्रीनाथ धामला जाणार आहेत. बदीरनाथमध्ये रात्री 11.30 वाजता पीएम मोदी बद्री विशालची विशेष प्रार्थना करणार आहेत. यानंतर 12 वाजता ते रिव्हरफ्रंटच्या विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत. यानंतर पंतप्रधान मोदी हे देशातील शेवटचे गाव मानले जाईल. येथे ते रस्ते प्रकल्पासह हेमकुंड साहिब रोपवे प्रकल्पांची पायाभरणी करणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता पंतप्रधान मोदी अरायव्हल प्लाझा आणि तलावांच्या विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत.