पंतप्रधान नरेंद्र मोदी, जिनपिंग, पुतीन एकाच व्यासपीठावर येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी, जिनपिंग, पुतीन एकाच व्यासपीठावर येणार

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 15 आणि 16 सप्टेंबर रोजी SCO शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी उझबेकिस्तानच्या शहरातील समरकंद येथे पोहोचणार असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 15 आणि 16 सप्टेंबर रोजी SCO शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी उझबेकिस्तानच्या शहरातील समरकंद येथे पोहोचणार असल्याची माहिती मिळत आहे. इथे जिनपिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन एकाच व्यासपीठावर दिसतील. तर, पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ प्रथमच SCO शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.

SCO प्रमुखांच्या राज्य परिषदेची 2022 ची वार्षिक शिखर परिषद 15-16 सप्टेंबर रोजी समरकंद येथे होणार आहे. उझबेकिस्तानने 17 सप्टेंबर 2021 रोजी ताजिकिस्तानमधून संघटनेचे अध्यक्षपद स्वीकारले. प्रदेशात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करणे, गरिबी कमी करणे आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे यावर या परिषदेत चर्चा होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या या परिषदेलाही उपस्थित राहणार आहेत. तसेच गलवान खोऱ्यावरून भारत-चीन संबंधांमध्ये निर्माण झालेल्या तणावादरम्यान पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय बैठक देखील होऊ शकते. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ देखील SCO परिषदेत सहभागी होणार आहेत, त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ एकाच व्यासपीठावर दिसणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com