Vande Bharat Express: आज पुण्यातील पहिल्या वंदे-भारत एक्स्प्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्याला मिळालेल्या पहिल्या वंदे-भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण आज सोमवार, 16 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने होणार असून पुणे-हुबळी या वंदे-भारत एक्स्प्रेसला केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ हे पुणे स्थानकावरुन झेंडा दाखवणार आहे. सोमवारपासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात होणार असल्याची माहीती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
गेल्या अनेक महिन्यांपासून पुणेकरांना प्रतिक्षित असणारी तसेच पुण्याहून सुटणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसमुळे सातारा, मिरज, सांगली आणि कोल्हापूरमधील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोदी सरकारकडून महाराष्ट्राला 3 नव्या वंदे भारत एक्स्प्रेस मिळाल्या आहेत. यामध्ये पुणे-हुबळी, नागपूर-सिकंदराबाद आणि कोल्हापूर-पुणे आदी मार्गाचा समावेश आहे. या तिन्ही वंदे भारतचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
2019 या वर्षी मेक इन इंडिया अंतर्गत देशात पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरु करण्यात आली होती. तेव्हापासून देशभरामध्ये विविध राज्यांमध्ये वंदे भारत एक्सप्रेसचा वेगाने विस्तार होतोय. या एक्सप्रेसमध्ये पुणे-हुबळी, नागपूर सिकंदराबाद आणि कोल्हापूर पुणे अशा मार्गांचा समावेश आहे. तसेच यामध्ये देशभरातील इतर वंदे भारत एक्सप्रेसचा देखील समावेश आहे.