premacha tea
premacha teateam lokshahi

'प्रेमाचा चहा' मालकाची दीड कोटींची फसवणूक

लोणी काळभोर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल
Published by :
Shubham Tate
Published on

premacha chaha : 'प्रेमाचा चहा' या प्रसिद्ध चहाच्या स्टॉलवर ऑपरेटर म्हणून काम करत असताना, कंपनीच्या महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातील फ्रँचायझी, तेथून मिळालेले पैसे स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करून बनावट कागदपत्रे बनवत. कंपनीचे 1 कोटी 67 लाखांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. (premacha chaha ex director fraud 1 5 cr by giving frechise)

न्यायालयाच्या आदेशानुसार लोणी काळभोर पोलिसांनी तत्कालीन संचालक अमित गोरक्षनाथ मगर (रा. डॅफ्रोडिल्स, मगरपट्टा सिटी, हडपसर) आणि स्वप्नील बाळासाहेब तुपे (रा. माळवाडी, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

premacha tea
Shinde Govt : शिंदे सरकार महाराष्ट्रात टिकू शकणार नाही, धक्कादायक दावा

याप्रकरणी सिद्धार्थ पंढरीनाथ भाडले (वय-38 वर्षे, रा. उरुळी देवाची, हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 1 फेब्रुवारी 2021 ते 4 एप्रिल 2022 दरम्यान घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'प्रेमाचा चहा'ची दुकाने पुणे आणि इतर ठिकाणी आहेत. अमित मगर आणि स्वप्नील तुपे प्रेमाचा चहा प्रायव्हेट लिमिटेडमध्ये संचालक म्हणून काम करत होते. त्यांनी कंपनीचा जीएसटीही जमा केला नाही आणि कंपनीचा आयकरही जमा केला नाही. कंपनीत जमा झालेली रक्कम त्यांनी आपल्या खात्यात जमा करून अनधिकृतपणे आउटलेट वाटप केले.

premacha tea
condom addiction : कंडोममधून घेतायेत वाफ, पितायेत पाणी, तरुणांमध्ये वाढत चाललाय नशेचा नवा ट्रेंड, कारण...

यासोबतच सोशल मीडियावर नियंत्रण ठेवत कंपनीच्या नोंदणीकृत मोबाईलवर 'प्रेमाचा चहा' या खाद्यपदार्थाच्या नावाने एलएलपी कंपनीचा वापर करून कंपनीचे नुकसान केले. यासोबतच 7 जून 2021 रोजी तक्रारदार आणि विक्रांत भाडले यांना कंपनीच्या फेसबुक पेजवरून कोणतीही पूर्वसूचना न देता बेकायदेशीरपणे काढून टाकण्यात आले. कंपनीच्या किरकोळ विक्रेत्यांशी केलेल्या लेखी कराराचे नुकसान झाल्याची खोटी माहितीचा दाखला ही त्यांनी दिला आहे.

कंपनीने या दोन्ही आरोपींना संचालक पदावरून हटवले. कोणतेही अधिकार नसतानाही त्यांनी मिळून आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील किरकोळ विक्रेत्यांना फ्रँचायझी दिल्या आणि त्यांच्याकडून मिळालेले पैसे त्यांच्या स्वत:च्या बँक खात्यात जमा करून कंपनीची फसवणूक केली. आरोपींनी मोबाईल चोरून कंपनीची दिशाभूल केली. आरोपींनी बोगस कागदपत्रे तयार करून कंपनीची 1 कोटी 67 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक घोडके तपास करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com