मुंबई महापालिकेच्या आशा सेविका भरतीमध्ये विवाहित महिलांना प्राधान्य
मुंबई महापालिकेच्या आशा सेविका भरतीमध्ये विवाहित महिलांना प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य केंद्रात 1000 ते 1200 लोकसंख्येसाठी एक आशा स्वयंसेविका आणि अशा 250 घरांकरता नेमणूक करण्यात येईल. असे महापालिकेतील सूत्रांची माहिती दिली आहे.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने या संदर्भात जाहिरात काढली असून यामध्ये विवाहित आशा सेविकांना प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती आहे. आशा सेविकांवर विविध आजारांचे रुग्ण, गरोदर माता आणि बालकांचे लसीकरण, कुटुंब नियोजन, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांबाबत प्रबोधनाची तसेच उपाययोजनांचीही जबाबदारी असणार आहे.
राज्यभरात साधारण 70 हजार आशा सेविका कार्यरत आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत आशा स्वयंसेविका योजना राबवण्यात येते.आशा सेविकांची वयोमर्यादा सुद्धा 25 ते 40 वर्षे ठेवण्यात आली आहे.