bulldozer
bulldozerTeam Lokshahi

Prayagraj Violence: जावेदच्या घरावर बुलडोझर चालताच लोकांनी अवैध घरे केली रिकामी

उत्तर प्रदेशात 10 जून रोजी झालेल्या हिंसाचारानंतर सरकार धडक कारवाई सुरु केली आहे. रविवार हिंसाचारातील मुख्य आरोपी जावेदचे घर २४ तासांत पाडण्यात आले.
Published by :
Team Lokshahi
Published on

उत्तर प्रदेशात 10 जून रोजी झालेल्या हिंसाचारानंतर सरकार धडक कारवाई सुरु केली आहे. रविवार हिंसाचारातील मुख्य आरोपी जावेदचे घर २४ तासांत पाडण्यात आले. प्रयागराजमध्ये बुलडोझर फिरवल्यानंतर आता ते लोकही घाबरले आहेत. अनेक वर्षांपासून अवैधरितीने ताब्यात घेतलेली घरे आणि दुकाने रिकामी केली जात आहेत.

प्रयागराजच्या अटाळा भागात शुक्रवारी हिंसाचार झाला होता. माजिदी इंटर कॉलेजच्या जमिनीवर बांधलेली दुकाने बुलडोझरच्या भीतीने रिकामी केली जात आहेत. ज्या दुकानातून लोक आपल्या कुटुंबाचे उदर्निर्वाह करत होते ती दुकाने रिकामी केली जात आहेत. यावेळी कोणी काही बोलत नसले तरी दुकाने रिकामी केली जात आहेत.

bulldozer
नमाजानंतर हिंसाचार : मंदिरावर दगडफेकीनंतर पोलिसांचा गोळीबार, १ ठार

68 जणांच्या मालमत्तेची माहिती

पोलिसांनी आतापर्यंत 68 जणांना अटक केली आहे. त्यांच्या घरांवर खुणा करण्यात आल्या आहेत. बेकायदेशीरपणे बांधलेली घरे कोणाला मिळाली आहेत, याची माहिती संकलित करण्यात येत आहे. या सर्वांच्या घरांची तपासणी करण्यासाठी प्रयागराज विकास प्राधिकरण आणि महसूल विभागाची पथके तैनात करण्यात आली आहेत.

याशिवाय अटाळा परिसरात सुरू असलेल्या बिर्याणी आणि लस्सीच्या दुकानाचीही ओळख पटली आहे. येथेही बुलडोझर चालवला जाण्याची शक्यता आहे. अटाळा येथील हिंसाचारातील मुख्य आरोपी मोहम्मद जावेद उर्फ ​​जावेदचे पाच कोटींचे घर बुलडोझर लावून जमीनदोस्त करण्यात आले आहे.

bulldozer
IPL Media Rights: आयपीएलच्या एका सामन्याची किंमत 100 कोटी, सोनीने घेतले हक्क?

अटाळ्यात इतके दगड आले कुठून?

अटाळा येथे शुक्रवारी नमाज पढल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात इतके दगडफेक झाली की त्यांची मोजदाद करणे कठीण झाले होते. हे दगड आले कुठून? हा एक मोठा प्रश्न आहे. अटाळा परिसरात तीन ते चार घरांचे बांधकाम सुरू असल्याचे समजते. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात विटा पडल्या होत्या. दगडफेक करणाऱ्या हल्लेखोरांनी त्याचा जोरदार वापर केला.

प्रयागराजच्या अटाळा रोडवर नुरुल्ला रोड आणि शौकत अली मार्गालगतच्या अनेक रस्त्यांवरून उपद्रवी आले आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत पोलिस असोत की सामान्य माणूस किंवा पत्रकार सगळेच जखमी झाले. त्याचवेळी या दगडफेकीत अटाळा रोड व रस्त्यावर ठेवलेली चारचाकी वाहने दगडफेकीचा बळी ठरली.

या हिंसाचाराला तीन दिवस उलटून गेले आहेत, मात्र अटाळा येथील कोलाहलानंतर अटाळा ते प्रयागराजकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर आणि गल्लीबोळात शांतता आहे. सर्वत्र पोलीस आणि आरएएफचे जवान तैनात आहेत.

ज्यांनी रस्त्याच्या कडेला छोटी दुकाने थाटली होती, ती सर्व दुकाने हिंसाचारामुळे बंद झाली आहेत. या सर्व रिकाम्या रस्त्यांवर आता फक्त पोलिसच दिसत आहेत. पोलिसांकडूनही उपद्रवी लोकांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. त्यांना तुरुंगात पाठवले जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com