सावरकरांबद्दल माझ्या मनातही आदर होता, मात्र आता...; प्रणिती शिंदे असे का म्हणाल्या?
शिवानी वडेट्टीवार यांनी सावरकरांबाबत वक्तव्य केलं होते. शिवानी म्हणाल्या होत्या की, "बलात्कार हे राजकीय हत्यार आहे, अशा विचारांचं सावरकरांनी समर्थन केलं, असा दावा शिवानी यांनी केलाय. हे लोक फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर कधीच मोर्चा काढणार नाहीत. तर सावरकरांवर मोर्चा काढतात. सावरकरांचे विचार होते, बलात्कार हे राजकीय हत्यार आहे. हे तुम्ही आपल्या राजकीय विरोधकांविरोधात वापरलं पाहिजे. या विचारांचे ते समर्थन करतात. मग माझ्यासारख्या महिला भगिनींना कसं सेफ वाटेल. असे त्या म्हणाल्या होत्या
त्यानंतर आता सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सावरकरांबद्दल मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानावरुन आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सावरकर यांच्या 'सहा सोनेरी पाने' हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या मनात सावरकरांबद्दल शंका निर्माण झाली. सावरकरांबद्दल माझ्या मनातही आदर होता. मात्र, त्यांचे सहा सोनेरी पाने हे पुस्तक वाचल्यानंतर आपण सगळे शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानता. त्यांच्या सहा सोनेरी पाने या पुस्तकात सावरकरांनी महाराजांबाबत अपमान केला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलही त्यांनी अपशब्द लिहिले आहेत.'मोदीजी तुम्ही कितीही प्रयत्न करा हा देश नेहरू गांधींचाच असेल, मोदी सावरकरांचा कधीच नसेल. असे प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत.