Prakash Shendge : हाकेंचं आंदोलन फक्त झाकी आहे, अभी बहोत कुछ बाकी है

Prakash Shendge : हाकेंचं आंदोलन फक्त झाकी आहे, अभी बहोत कुछ बाकी है

प्रकाश शेंडगे यांना माध्यमांशी बोलत होते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

प्रकाश शेंडगे यांना माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, मुंबई ही आमची आहे. मूळ मुंबईकर आम्ही आहोत ना. तुम्ही या ना तिथे. आमच्या मुलाबाळांचे भविष्य हिसकावण्यासाठी तुम्ही मुंबईत येणार असाल तर हा मुंबईकर जो ओबीसी आहे, जो कुणबी आहे. तो शांत बसेल? महाराष्ट्राची जी सामाजिक घडी आहे. ती विस्कटण्याचा प्रयत्न कुणी करु नये. जर या गरीब समाजाचे आरक्षण कुणी दिवसाढवळ्या हिसकावून घेत असेल तर आम्ही शांत बसणार नाही.

हाकेंचं आंदोलन फक्त झाकी आहे, अभी बहोत कुछ बाकी है. आम्हाला तुमचं आरक्षण हिसकावून घ्यायचं नाही आहे. तुमचं 10 टक्के आरक्षण तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही घ्या ना. आम्ही कुठं नाही म्हणतोय. आम्ही पाठिंबा दिला आहे तुम्हाला. पण तुम्ही म्हणाल आम्ही ओबीसीतून घेणार आणि नाही घेतलं तर सुट्टी देणार नाही आम्ही. याला पाडू त्याला पाडू. काय लावलं आहे महाराष्ट्रामध्ये.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, जरांगे तुम्ही भुजबळ साहेबांवरती किंवा आमच्या नेत्यांवरच्या शिव्या तुम्ही नाही थांबवल्या तर आमची पोरसुद्धा शांत बसणार नाहीत. शिव्या ज्या आहेत त्या थांबवा याठिकाणी कायद्याची भाषा बोला, संविधानाची भाषा बोला ना. असे प्रकाश शेंडगे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com