Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर उद्या लक्ष्मण हाकेंची भेट घेणार

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर उद्या लक्ष्मण हाकेंची भेट घेणार

लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे.
Published on

लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके उपोषण करत आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत.

याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर उद्या लक्ष्मण हाकेंची भेट घेणार आहेत. प्रकाश आंबेडकर यांची लक्ष्मण हाकेंसोबत फोनवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तब्येतीची विचारपूस करत काळजी घेण्याचं आवाहन केलं असल्याचे समजते आहे.

उद्या सकाळी १० वाजता प्रकाश आंबेडकर हाकेंच्या वडीगोद्रीतील उपोषणस्थळी जाणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com