प्रकाश आंबेडकर मोठी घोषणा करणार! अनेक चर्चाणा उधाण, राजकारणात मोठी उलथापालथ?
आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल लवकरच राज्यात वाजणार आहे. याच पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत. यातच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आज एक मोठी घोषणा करणार असल्याच सांगितलं आहे. वंचित बहुजन आघाडीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून व्हिडीओ ट्वीट
आघाडीच्या अधिकृत ट्विटरवरुन एक व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. या व्हिडीओत आज संध्याकाळी 4 वाजता एक मोठी घोषणा होणार असल्याचे सांगितलं आहे. औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेच आयोजन करण्यात आलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांचं ट्विट
“आज मी मोठी घोषणा करणार आहे. यासाठी औरंगाबादमधील सुभेदारी शासकीय विश्रामगृहावर दुपारी 4 पत्रकार परिषद घेणार आहे”, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करुन दिली.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर नेमकी काय घोषणा करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच आंबेडकरांच्या घोषणेनंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात विविध चर्चाना उधाण आलं आहे. त्यामुळेआता प्रकाश आंबेडकर काय घोषणा करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.