प्रकाश आंबेडकर यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; भेटीचं कारण काय?

प्रकाश आंबेडकर यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; भेटीचं कारण काय?

आज प्रकाश आंबेडकर यांची महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आज प्रकाश आंबेडकर यांची महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे आज प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची रात्री उशिरा भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.

अंतरवाली सराटीमध्ये मध्यरात्री बाराच्या सुमारास प्रकाश आंबेडकर हे अंतरवली सराटी मध्ये दाखल झाले. यावेळी मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात तासभर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com