सुनावणीपूर्वी प्रफुल पटेलांचा शरद पवार गटावर निशाणा

सुनावणीपूर्वी प्रफुल पटेलांचा शरद पवार गटावर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर केंद्रीय निवडणूक आयोगात आज पहिल्यांदाच प्रत्यक्ष सुनावणी पार पडत आहे.
Published by :
shweta walge
Published on

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर केंद्रीय निवडणूक आयोगात आज पहिल्यांदाच प्रत्यक्ष सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: निवडणूक आयोग कार्यालयात दाखल झाले आहेत. सुनावणीपूर्वी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला.

प्रफुल पटेल म्हणाले, दोन्ही गटाचे वकील आयोगात आपली बाजू मांडणार आहेत. आम्हाला खात्री आहे की जवळपास संघटनात्मक अधिक लोक आमच्यासोबत आहेत. निवडणूक आयोगाने एप्रिल महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसती राष्ट्रीय मान्यता काढून घेतली आहे. त्यामुळे नागालँड आणि महाराष्ट्र या दोन राज्यात आम्हाला मान्यता प्राप्त आहे. त्या अर्थाने नागालँडमधील ७ आमदार तर महाराष्ट्रातील ५३ पैकी ४३ आमदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे.

इतर संघटनात्मक लोक आमच्यासोबत आहेत. आम्ही लाखोंच्या संख्येत प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. समोरचे लोक काही ताकद दाखवू शकले नाही. तरी हा माझा विषय नाही. निवडणूक आयोग योग्य निर्णय घेणार, असे पटेल म्हणाले.

सुनावणीपूर्वी प्रफुल पटेलांचा शरद पवार गटावर निशाणा
राष्ट्रवादी कुणाची? सुनावणीसाठी निवडणूक आयोगात शरद पवार दाखल

शरद पवार निवडणूक आयोगात हजर राहणार आहेत. यावर प्रफुल पटेल म्हणाले, निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. ज्यांना संविधानात वेगळा निर्णय दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या दर्जाचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे तिथं कोण गेलं. तो विषय महत्वाचा नाही. तथ्य आणि कायदा महत्वाचा आहे. आम्हाला विश्वास आहे की निवडणूक आयोग पक्ष आणि चिन्ह आम्हाला देईल. असा विश्वास प्रफुल पटेल यांनी दर्शविला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com