Malegaon : पालिकेच्या मराठी शाळांची दुरवस्था; 83 शाळांमध्ये 81 उर्दू शाळा तर फक्त दोनच मराठी शाळा
मालेगावमध्ये पालिकेच्या मराठी शाळांचं विदारक चित्र समोर आलं आहे. पालिकेच्या 83 शाळांमध्ये 81 उर्दू शाळा तर फक्त दोनच मराठी शाळा आहे. मनपाच्या शाळांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनपा शाळेच्या शिक्षणाचा दर्जा देखील घसरला असून मराठी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची शहरात चर्चा आहे.
यातही धक्कादायक बाब म्हणजे या मनपाच्या शाळेत रुजू नियमित शिक्षक वर्गात हजर न राहता त्यांनीच त्यांच्याच हाताखाली मानधन तत्त्वावर शिक्षक ठेवून स्वतः मात्र बाहेर बिनधास्त फिरून दुसरे काम करण्याचा प्रकार मालेगावात आलेले एक न्यायधिश व त्यांच्या पथकाने उघडकीस आणला होता.
याप्रकरणी सबंधित शाळांना नोटिसा तर देण्यात आल्या मात्र या प्रकरणाला आता 6 महिने होत आल्याने तेरी भी चूप मेरी भी चूप करून प्रकरण दाबले जाते की कारवाई होते आणि राजकीय पुढारी देखील मराठी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना न्याय मिळून देण्यासाठी प्रयत्न करतील का? मालेगावात मराठी शाळांची संख्या वाढेल का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.