Pooja Khedkar Latest News
Pooja KhedkarGoogle

Pooja Khedkar: ऑडी कारने २१ वेळा वाहतुकीचे नियम मोडले! खेडकर कुटुंबीयांनी 'इतक्या' रुपयांचा भरला दंड

महाराष्ट्र केडरच्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात गैरव्यवहार केल्याचा आरोप पूजा खेडकर यांच्यावर करण्यात आला आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

Pooja Khedkar Audi Car Latest News: महाराष्ट्र केडरच्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र केडरच्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात गैरव्यवहार केल्याचा आरोप पूजा खेडकर यांच्यावर करण्यात आला आहे. खेडकर यांचं प्रकरण थेट दिल्लीत पोहोचलं. त्यानंतर पूजा खेडकर यांची पूण्याहून वाशिमला बदली करण्यात आली. अशातच खेडकर यांच्या वादग्रस्त ऑडी कारबाबत मोठी माहिती समोर आली आहे. ऑडी कारमध्ये अंबर दिवा लावल्यामुळं खेडकरांच्या अडचणी वाढल्या होत्या. तसच ती कार खेडकर यांच्या नावावर नसून एका कंपनीच्या नावावर रजिस्टर्ड आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरु झाल्यानंतर खेडकर कुटुंबीयांनी कारवर आकारलेला २७४०० रुपयांचा दंड भरला आहे.

पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांनी वादग्रस्त ऑडी कारचा दंड भरला आहे. खेडकर यांनी २७४०० रुपयांचं ऑनलाईन ईचलन भरलं आहे. या ऑडी कारने २१ वेळा वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं होतं. अंबर दिवा लावलेली ऑडी कार खेडकर कुटुंबीयांच्या डायरेक्टर असलेल्या कंपनीच्या नावावर आहे. पूजा खेडकर हीच कार चालवत असल्याचंही समोर आलं आहे.

ट्रॅफिक पोलिसांनी पाठवली होती नोटिस

प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना पुणे शहर वाहतूक पोलिसांनी नोटिस पाठवली होती. कारवर बेकायदेशीरपणे अंबर दिवा आणि महाराष्ट्र सरकारचा बोर्ड लावल्यानं पोलिसांनी खेडकर यांना नोटिस दिली. त्यानंतर खेडकर कुटुंबीयांनी ऑडी कारचं २७४०० रुपयांचं ऑनलाईन ईचलन भरलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com