Police notice to refinery opponents
Police notice to refinery opponentsTeam Lokshahi

रिफायनरी विरोधकांना पोलिसांची नोटीस

तडीपार करण्याचा प्रस्ताव अद्याप मंजूर केलेला नाहीये.
Published by :
Vikrant Shinde
Published on

लक्ष्मीकांत घोणसेपाटील, रत्नागिरी

राजापूर तालुक्यातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे सत्यजित चव्हाण ,नरेंद्र जोशी, अमोल बोळे, नितीन जठार, दीपक जोशी, सतीश बने या सर्व नागरिकांवर तडीपारची कारवाई का करू नये यासाठी नोटीस दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र तडीपार करण्याचा प्रस्ताव अद्याप मंजूर केलेला नाहीये.

Police notice to refinery opponents
चिपळूण पेठमाप मधील एका महिलेचा खून

या सर्व व्यक्तींवर तडीपार कारवाई करण्याआधी त्यांना समक्ष बोलावून याबाबत विचारणा करण्यासाठी ही नोटीस दिल्याचे प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. आपले म्हणणे मांडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा यांचे समक्ष हजर राहण्याबाबत ही नोटीस दिली आहे. मात्र कितीही दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तरी विनाशकारी रिफायनरीचा लढा आणखी तीव्र करणार असल्याची प्रतिक्रिया प्रकल्प विरोधक अमोल बोळे यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com