PM नरेंद्र मोदींनी दिलं रेसलर पुजाला प्रोत्साहन; तिकडे पाकिस्तानी पत्रकारही झाला मोदींचा फॅन

PM नरेंद्र मोदींनी दिलं रेसलर पुजाला प्रोत्साहन; तिकडे पाकिस्तानी पत्रकारही झाला मोदींचा फॅन

पाकिस्तानी पत्रकाराने आपल्या देशातील नेत्यांवर काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत.
Published by :
Sudhir Kakde
Published on

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध खेळांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंशी सतत संपर्कात आहेत. विजेत्यांचं अभिनंदन आणि पराभूत झालेल्यांना प्रोत्साहन देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. कॉमनवेल्थ गेम्समध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत वेगवेगळ्या खेळाडुंच्या संपर्कात आहेत. या कृतीमुळे पाकिस्तानी पत्रकार पीएम मोदींचा चाहता झाला आहे. या पत्रकारानं ट्विट करून आपल्या देशातील खेळाडूंना प्रोत्साहन दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचं कौतुक केलंय. त्याचबरोबर त्यांनी आपल्या देशातील नेत्यांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

पंतप्रधान मोदींनी पूजा गेहलोत यांना प्रोत्साहन दिलं

कॉमनवेल्थ गेम्समधील कुस्ती सामन्यात पूजा गेहलोत शेवटच्या सामन्यात हरली आणि तिला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. पूजा यामुळे खूप निराश झाली आणि सुवर्णपदक मिळवता न आल्याचं दुःख तीने व्यक्त केलं. पुढच्या वेळी सुवर्णपदक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं तिनं सांगितलं. अशाप्रकारे पूजा नाराज असताना पंतप्रधान मोदींनी तिला प्रोत्साहन देण्याचं काम केलं. पूजा तु मिळवलं पद आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, तुमचा जीवन प्रवास आम्हाला प्रेरणा देतो. तुमच्या यशाचा आम्हाला आनंद आहे. तुमच्या आयुष्यात अजून यश मिळवायचं आहे.

PM नरेंद्र मोदींनी दिलं रेसलर पुजाला प्रोत्साहन; तिकडे पाकिस्तानी पत्रकारही झाला मोदींचा फॅन
PM मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडतेय निती आयोगाची बैठक; मागच्या रांगेत दिसले CM शिंदे

पाकिस्तानी पत्रकार शिराज हसन यांनी पंतप्रधान मोदींच्या या कृतीचं कौतूक करत ट्विट केलं आहे. पाकिस्तानी नेत्यांना सवाल करत शिराज यांनी लिहिलंय की, आमचे खेळाडू पदक जिंकत आहेत. हे आमच्या देशातील नेत्यांनाही माहीती तरी आहे का? असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला. शिराज यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 'भारतातील लोक आपल्या खेळाडूंना अशा प्रकारे प्रोत्साहन देतायेत. पूजाला सुवर्ण जिंकू न शकल्याबद्दल दु:ख होतं, म्हणून तिच्या पंतप्रधानांनी तिला प्रोत्साहन दिलं. असा काही संदेश पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी किंवा राष्ट्रपतींनी कधी दिला आहे का? आमचे खेळाडू जिंकत आहेत हे त्यांना माहीत तरी आहे का?

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com