पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा; आदित्य ठाकरेंचं BMC आयुक्तांना पत्र
येत्या 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई महानगरपालिकेच्या सीवेज ट्रीटमेंट प्लांट तसेच इतर विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुंबईत येणार आहेत. येत्या 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई महानगरपालिकेच्या सीवेज ट्रीटमेंट प्लांट तसेच इतर विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुंबईत येणार आहेत. या दौऱ्यात मेट्रो २-ए आणि मेट्रो ७ चे उद्घाटनदेखील करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं जाईल. मोदी यांच्या हातून आणखी एक मोठं उद्घाटन होणार आहे. मुंबईतल्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण. यासह बाळासाहेब ठाकरे आपका दवाखाना योजनेअंतर्गत ५२ दवाखान्यांचं उद्घाटनही मोदींच्या हस्ते केलं जाईल.
याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी BMC आयुक्तांना पत्र लिहिले आहे. आदित्य ठाकरे यांनी पत्रात लिहिले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळातच सीवेज ट्रीटमेंट प्लांट आणि खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करणाऱ्या प्रकल्पाला गती मिळाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतीक्षेसाठी या प्रकल्पाच्या उद्घाटनाला विलंब केला गेला. असे त्यांनी पत्रात लिहिले आहे
यासोबतच त्यांनी पुढे लिहिले की, सीवेज ट्रीटमेंट प्लांटसंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण झालेल्या असतानाही याचे भूमीपूजन आतापर्यंत का झाले नाही? कुणाच्या प्रतीक्षेत एवढा सहा महिन्यांचा काळ वाया घालवला, असे देखिल आदित्य ठाकरे यांनी पत्रात लिहिले आहे.