पंतप्रधान मोदी आज मुंबईत; जाणून घ्या वाहतूक व्यवस्था कशी असेल
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने जोरदार तयारी केली आहे. अनेक विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. बीकेसीच्या मैदानावर भाजप मोठा कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावेळी वर्सोवा-घाटकोपर ही मेट्रो १ सेवा बंद ठेवली जाणार आहे. सायंकाळी ५.४५ ते ७.३० दरम्यान ही सेवा बंद ठेवली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एम एम आर डी ए मैदान आणि मेट्रो सात मार्गिका गुंदवली आणि मोगरापाडा स्थानका दरम्यान ड्रोन, पॅरागलाईडर आणि रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट उडवण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मोदींच्या दौर्याच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी हे क्षेत्र उड्डाण प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
तसेच पश्चिम दृतगती महामार्ग, धारावी, वरळी सिलींककडून बिकेसी परिसर कुर्लाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना फॅमीली कोर्ट जंक्शनकडून पुढे कुर्ल्याच्या दिशेने जाण्यासाठी प्रवेश बंदी राहणार आहे. खेरवाडी शासकीय वसाहत कनाकीया पॅलेस, वाल्मीकी नगरकडून पुढे बीकेसी परिसर, चुनाभट्टी तसेच कुर्ल्याच्या दिशेने जाता येणार नाही. सुर्वे जंक्शन आणि रजाक जंक्शनवरुन बिकेसी परिसर, धारावी, वरळी सिलींकच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना एमटीएनएल जंक्शन येथून प्रवेश बंदी असेल.
पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी, वरळी सिलींककडून बिकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने एमएमआरडीए जंक्शन येथून धारावी टी जंक्शनवरून कुर्ल्याकडे तसेच पूर्व दृतगती मार्गाकडे मार्गस्थ होतील.सुर्वे जंक्शन आणि रजाक जंक्शनवरुन पश्चिम दृतगती महामार्ग, धारावी, वरळी सिलीकच्या दिशेने जाणारी वाहने सुर्वे जंक्शन, रजाक जंक्शन, एमटीएनएल जंक्शन येथुन सिएसटी रोडने मुंबई विद्यापीठ मेनगेट, आंबेडकर जंक्शन, हंसभुग्रा जंक्शन येथून पुढे इच्छीत स्थळी मार्गस्थ होतील.
मुंबईतील वाहतूकीतीबाबत वाहतूक विभागाच्या अधिकृत माध्यमांवरून वेळोवेळी माहिती मिळणार आहे. आपल्याला कोणतीही समस्या अथवा शंका असल्यास आमच्याशी हेल्पलाईन क्रमांक अथवा ट्विटरवर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केलंय.