PM Modi on hariyana result
PM Modi on hariyana resultTeam Lokshahi

PM Narendra Modi: "हरियाणातील दलितांनी भाजपला पाठिंबा दिला"

पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. हरियाणातील दलीतांनी भाजपला दिलेल्या पाठिंब्यावर जोरदार भाष्य केले.
Published by :
Team Lokshahi
Published on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. हरियाणातील दलीतांनी भाजपला दिलेल्या पाठिंब्यावर जोरदार भाष्य केले. हरियाणाच्या शेतकऱ्यांमध्ये भाजपच्या योजनांमुळे खूप आनंद आहे, आणि यामुळे काँग्रेसच्या सर्व प्रयत्नांना हरियाणाच्या जनतेने धक्का दिला आहे. मोदींनी स्पष्ट केले की तिसऱ्या टर्ममध्ये सत्ता स्थापन करणे कठीण होते, पण जनतेने विकासासाठी भाजपला कौल दिला आहे. काँग्रेसने हिंदू समाजात आग लावण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु भाजपचा विकासात्मक दृष्टिकोन या सर्वांवर वरचढ ठरला आहे.

महाराष्ट्रातील विकासाकामे

महाराष्ट्रात 10 नवीन मेडिकल कॉलेजचे उ‌द्घाटन करण्यात आले. ठाणे आणि मुंबईतील मेट्रो प्रकल्पांचे उद्घाटन, यामुळे महाराष्ट्रातील विकासाची गती लक्षात येते. मोदींनी या प्रकल्पांची महत्त्वपूर्णता दर्शवली आणि जनतेला विश्वास दिला की भाजपच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण सुलभ होणार आहे. यामुळे गरीब मुलांना नवीन संधी उपलब्ध होणार आहेत, ज्यामुळे ते डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहेत. भाजप सरकारने गरिबी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. जागतिक स्तरावर भारत मानव संसाधन केंद्र म्हणून ओळखला जात आहे. युवकांना ग्लोबल स्टँडर्डवर प्रशिक्षित करण्यात येत आहे, ज्यामुळे त्यांना संधी मिळत आहे.

काँग्रेसची राजकीय नीती आणि जनतेत फूट

मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ज्यात त्यांनी म्हटले की काँग्रेसने जाती-जातीत भांडण लावण्याचे काम केले आहे. काँग्रेसने दलीत समुदायात अर्बन नक्षल टोळीच्या माध्यमातून खोटे संदेश पसरवले आहेत. मात्र दलितांनी भाजपला पाठिंबा दिला. मोदींनी स्पष्ट केले की काँग्रेसची नीती हिंदू समाजात फूट पाडत आहे. ज्यामुळे ते त्यांच्या मतबंदीत धोका निर्माण करतात. काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवून जनतेत असंतोष निर्माण केला, परंतु भाजपच्या योजनांमुळे शेतकऱ्यांचा विश्वास वाढला आहे. मोदींनी म्हटले की काँग्रेसचे अर्बन नक्षल कटाचे शिकार होणार नाहीत, कारण भाजपचा विकासात्मक दृष्टिकोन स्पष्ट आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com