शिंजो आबे यांच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान मोदी जपानला रवाना
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपान दौऱ्यावर सोमवारी रवाना झाले आहेत. या दौऱ्यात ते उद्या (२७ सप्टेंबर) रोजी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पंतप्रधानांच्या भेटीबद्दल सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी टोकियोला रवाना झाले आहेत.
पंतप्रधान मोदींनी जपानला रवाना होण्यापूर्वी एक ट्विट करत माहिती दिली ते म्हणाले की, "माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी मी आज रात्री टोकियोला जात आहे." त्यांनी आबे यांना प्रिय मित्र आणि भारत-जपान मैत्रीचा मोठा समर्थक म्हटले आहे. सर्व भारतीयांच्या वतीने शोक व्यक्त करण्यासाठी जपानचे पंतप्रधान किशिदा आणि शिंजो आबे यांच्या पत्नींची देखील भेट घेणार असल्याची माहिती देखील पंतप्रधान मोदींनी दिली आहे.
जपानच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय बैठक घेणार पंतप्रधान मोदी
परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी ही माहिती देताना पत्रकारांना सांगितले की, सुमारे 12 ते 16 वर्षांच्या या तासभराच्या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदी त्यांचे जपानी समकक्ष फुमियो किशिदा यांच्यासोबत बैठका आणि द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. अशी माहिती क्वात्रा यांनी दिली.