PM Kisan Nidhi : शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय; आता शेतकऱ्यांना 10 हजार रुपये मिळणार
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. या योजनेंतर्गत दरवर्षी 6 हजार रुपये शासनाकडून दिले जातात. ही योजना संपूर्ण देशात लागू होणार आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या कल्याणासाठी दरवर्षी 10 हजार रुपये देणार आहे. म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतंर्गत दरवर्षी मिळणारे 6 हजार रुपये नक्कीच मिळतील. मात्र यासोबतच शेतकऱ्यांना चार हजार रुपये देण्यात येणार आहेत.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केंद्र सरकारने डिसेंबर 2018 साली केली होती. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजे पीएम किसान योजना ही केंद्राची योजना असून याचा सर्व खर्च केंद्र सरकारकडून केला जातो. मध्य प्रदेश सरकारनं ही नवी योजना सुरू केली असून तिला किसान कल्याण योजना असं नाव दिलं आहे.
ही योजना संपूर्ण देशात लागू होणार आहे. मात्र आता त्याच धर्तीवर आणखी एक योजना राज्य सरकारनं सुरू केली असून, त्यानुसार आता शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांऐवजी 10 हजार रुपये दिले जाणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी केली आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.