ताज्या बातम्या
Piyush Goyal यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केली मोठी घोषणा
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लादले आहे.
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लादले आहे. याविरोधात ठिकठिकणी शेतकरी आंदोलन करत आहेत. तात्काळ केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली.
या बैठकीनंतर पियुष गोयल म्हणाले की, 2410 रुपये प्रतिक्विंटल भावाने ही कांदा खरेदी करण्यात येईल. केंद्र सरकार नाफेड मार्फत दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. असे पियुष गोयल यांनी सांगितले.