मुश्रीफांचा शिंदे - फडणवीसांसोबत फोटो; सोमय्या म्हणाले...

मुश्रीफांचा शिंदे - फडणवीसांसोबत फोटो; सोमय्या म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावण्यात आले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावण्यात आले. या फोटोंनंतर चर्चांना उधाण आले. महाविकास आघाडीच्या नेतेमंडळीऐवजी मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री यांचे फोटो लावण्यात आले होते.

यावरुन आता प्रतिक्रिया येत आहेत. यातच आता एका पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या म्हणाले की, मुश्रीफ यांच्याविरोधात सुरू असलेल्या चौकशा थांबवण्यात येणार नाही. जरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे फोटो लावला असेल तर हा त्यांचा पक्षाचा विषय आहे. असे सोमय्या म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com