सकाळी ताब्यात घेतलेल्या पीएफआय कार्यकर्त्याला कल्याण कोर्टाने संध्याकाळ होताच सोडले
Team Lokshahi

सकाळी ताब्यात घेतलेल्या पीएफआय कार्यकर्त्याला कल्याण कोर्टाने संध्याकाळ होताच सोडले

आज पहाटे पोलिसांनी फरदीन याला त्याच्या कल्याण येथील घरातून ताब्यात घेतले होते.
Published by :
shweta walge
Published on

अमजद खान, कल्याण : कल्याणमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या पीएफआय कार्यकर्ता फरदीन पैकर याला कोर्टात हजर केले असता कोर्टात काही शर्तीवर सोडले आहे. आज पहाटे पोलिसांनी फरदीन याला त्याच्या कल्याण येथील घरातून ताब्यात घेतले होते.

सकाळी ताब्यात घेतलेल्या पीएफआय कार्यकर्त्याला कल्याण कोर्टाने संध्याकाळ होताच सोडले
कल्याणमधून पी एफ आय कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात

देशभरात पीएफआय या संघटने विरोधात तपास यंत्रणेकडून कारवाई सुरु आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये ही कारवाई करण्यात आली. आज पहाटे चार वाजताच्या सुमारास कल्याण क्राईम ब्राँच आणि बाजारपेठ पोलिसांनी कल्याणचे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पश्चिमेतील रोहिदास वाडा येथील फरदीन पैकर यांना घरातून ताब्यात घेतले. बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरु झाली. फरदीन यांचे भाऊ फरहान यांनी आम्हाला न्याय मिळणार कायद्यावर आामचा विश्वास आहे असे सांगत फरदीन हा कोणत्याही पीएफआय संघटनेशी संबंधित नाही. तो एसडीपीआय संघटनेचे काम करतो अशी प्रतिक्रिया दिली होती. बाजारपेठ पोलिसांनी फरदीन याला कल्याण कोर्टात हजर केले असता काही अटी शर्तीवर फरदीनला सोडले आहे.अशी माहिती पोलीस सूत्राने दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com