निवडणूक निकालानंतर पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर; काय आहेत दर ?
निवडणूक निकालानंतर देशातील इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर केले आहेत. मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 80 डॉलर प्रति बॅरलपेक्षाही कमी आहेत. ब्रेंट क्रूड ऑइलचा दर 76.98 डॉलर इतका आहे. तर, WTI क्रूड ऑइलचा दर 72.36 डॉलर प्रति बॅरल इतका आहे. गुरुवारच्या तुलनेत आज कच्च्या तेलाचे दर वधारले आहेत.
एप्रिल महिन्यात पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रति लिटर 80 पैशांची वाढ केली होती. त्यानंतर, केंद्र सरकारने 22 मे रोजी उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले होते. जुलै महिन्यात महाराष्ट्र सरकारने इंधन दरावरील व्हॅटमध्ये कपात केली होती.
देशातील प्रमुख शहरातील दर
मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर
चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
पेट्रोल-डिझेलच्या किमती एका क्लिकवर जाणून घ्या
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर पाहता येऊ शकतात.