वर्धा जिल्हा परिषद कार्यलयात रात्री उशिरापर्यंत पतीराज्यांच्या ठिय्या
Team Lokshahi

वर्धा जिल्हा परिषद कार्यलयात रात्री उशिरापर्यंत पतीराज्यांच्या ठिय्या

नव्याने आलेलं मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष देणार का?
Published by :
shweta walge
Published on

भूपेश बारंगे, वर्धा: जिल्हा परिषदेत मागील कार्यकाळात भाजपची सत्ता होती. याठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता विजय गाखरे या राहिल्या त्यांचा कार्यकाळ संपल्यावर या जिल्हा परिषदेवर सध्या निवडणूक लांबणीवर गेल्याने याठिकाणी प्रशासक आहे. नव्याने आलेलं मुख्य कार्यकारी अधिकारी सध्या जिल्हा परिषद कार्यभार सांभाळत आहे. जिल्हा परिषदेत 52 सदस्यांची निवड केली जाते. यात अनेक महिला जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत असतात. सर्वांचा कार्यकाळ संपला असूनही मात्र जिल्हा परिषद कार्यलयात माजी पदाधिकाऱ्याची पतीदेव आजही या कार्यलयात लुडबुडत करत आहे. अनेक पतीराज जिल्हा परिषदेत लुडबुडत करत असुन चतुर्थी श्रेणी कर्मचाऱ्यांच्यावर दबाव तंत्र वापरून त्याठिकाणी रात्री उशिरापर्यंत ठिय्या मांडून बसले राहत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत गुंगावत आहे.

जिल्हा परिषद मध्ये पतीराज्याचा रात्री उशिरापर्यंत ठिय्या हा संशयाच्या भोवऱ्यात आहे. आपले पिलावळ सोबत आणून अनेक विभाग कुडतडत असतात. पाणी पुरवठा विभागात तर मनमानी कारभार केला जात असल्याचे बोलले जात आहे. पाणी पुरवठा विभागात कुठं तरी पाणी मूरत असल्याची जोरदार चर्चा आहे. तर बांधकाम विभागातही हम करे सो कायदा सुरू असल्याची सांगण्यात येते. याठिकाणी आजही आम्ही म्हणेल त्याला कामाचे वाटप करा असे संबंधित अधिकाऱ्यावर दबावतंत्र सुरू असल्याचे दिसून येत आहे. अनेक विभागात पदाच्या दरारा दाखवत असून राज्य सरकार आमचेच असल्याचे आव आणत आहे. अश्या पतीराज्यावर आळा घालण्याची वेळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर आली आहे.

पतीराज्याचं रात्रीचा खेळ

जिल्हा परिषद मध्ये सहा वाजता नंतर पतीराज्याचं आगमन होते. त्यानंतर संबधित विभागात भ्रमंती मारले जाते. तेथील चतुर्थी श्रेणी कर्मचारी संवाद साधून आमचे कामे करा. त्यानंतर तुम्ही घरी निघा अशी तंबी दिली जाते. त्यामुळे अनेक कर्मचारी यांच्या दबावाला घाबरत असल्याची कुणकुण जिल्हा परिषद सुरू असते. रात्री उशिरापर्यंत त्या कर्मचाऱ्यांना थांबवून त्यांच्याकडून कामे करून घेत असल्याचे सांगण्यात येते यातून कंत्राटदाराशी आर्थिक देवाणघेवाण केले जात असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे कुठं तरी पाणी मूरत असल्याचे एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली आहे.

17 सामूहिक फंडाला सरिता विजय गाखरे अध्यक्ष निधी नाव

जिल्हा परिषदेत 17 सामूहिक विकास फंड द्वारे अध्यक्षाच्या सूचनेनुसार विकास कामे केले जाते.मात्र या फंडाला चक्क सरिता विजय गाखरे अध्यक्ष निधी असेच नाव देऊन फलक लावणल्याने अनेकांनी तोंडात बोट टाकले आहे. कारंजा तालुक्यातील अनेक कामे मंजूर केले असून तिथे भूमिपूजन करण्यात आले आहे. त्या फलकावर चक्क फंडाचे नाव न टाकता स्वतःच्या नाव टाकून निधी नाव देण्यात आले आहे. यावरून 'हम करे सो कायदा' असेच यातून दिसत आहे.हा प्रकार अत्यंत चुकीचा असून पदाचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य विरोधी पक्षनेते संजय शिंदे यांनी केला आहे.

वर्धा जिल्हा परिषद कार्यलयात रात्री उशिरापर्यंत पतीराज्यांच्या ठिय्या
समृद्धी महामार्गाचा शुभारंभ नववर्षात?

मुख्य कार्यकारी अधिकारी कारवाई करणार का?

जिल्हा परिषद मध्ये कार्यरत असलेले डॉ.सचिन ओंबासे यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता अनेक कामे लोकहिताचे केले आहे.त्यांनी आपल्या कार्यकाळाचा एक ठसा उमटवला आहे.त्यानंतर नुकतेच नव्याने मुख्य कार्यकारी अधिकारी रुजू झाले असुन त्यांच्या कार्यकाळ पदाधिकारी आजही मक्तेदारी करत असल्याने याला आळा घालणार का? शासकीय फंडाचे नाव स्वतःहूनच बदलवून स्वतःच्या नावाने निधी तयार केला असून यावर आता काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com