Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज मध्य-हार्बर मार्गावर रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक

Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज मध्य-हार्बर मार्गावर रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं 21 जुलै 2024 रोजी मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं 21 जुलै 2024 रोजी मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये मुलुंड ते माटुंगा या अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा सकाळी 11.05 ते दुपारी 3.05 या कालावधीत प्रभावित होणार आहे. या कालावधीत रेल्वेची देखभाल आणि दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे.

यासह हार्बर मार्गावरील सीएसएमटी-वांद्रे-चुनाभट्टी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी घरातून बाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक पहावं असं आवाहन रेल्वेनं केलं आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून वाशी/बेलापूर/पनवेलकरिता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून वांद्रे/गोरेगावसाठी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे.

पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सीएसएमटीकरिता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटीकरिता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला स्थानकादरम्यान विशेष सेवा 20 मिनिटांच्या वारंवारतेने चालवल्या जातील.

Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज मध्य-हार्बर मार्गावर रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक
पुन्हा नव्याने केंद्राकडे प्रस्ताव; 'बॉम्बे हायकोर्ट'चे 'मुंबई उच्च न्यायालय' नामांतर करण्याची मागणी
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com