अनिल देशमुख यांनी स्वतःच हल्ला घडवून आणला; डॉ. परिणय फुके यांचा खळबळजनक दावा
थोडक्यात
डॉ. परिणय फुके यांचा खळबळजनक दावा
अनिल देशमुख यांनी स्वतःच हल्ला घडवून आणला
हल्ला प्रकरण संशयास्पद असल्याचं परिणय फुकेंचं वक्तव्य
अनिल देशमुख यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. सभा आटपून परत येताना देशमुख यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत अनिल देशमुख गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी अनिल देशमुखांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काटोलच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन अनिल देशमुख यांना नागपूरला हलविण्यात आले. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यातच डॉ. परिणय फुके यांनी खळबळजनक दावा केला आहे.
डॉ. परिणय फुके म्हणाले की, काटोल येथे झालेली अनिल देशमुख यांच्यासंदर्भातली जी घटना आहे. याबद्दल मला माहिती मिळाली. यासंदर्भातली संपूर्ण माहिती मी पोलीस विभागाच्या माध्यमातून घेतलेली आहे. यासंदर्भातलं अनेक फोटो, व्हिडिओ माझ्यापर्यंत आलेलं आहेत. मी या माध्यमातून काटोलच्या जनतेला सर्तक करण्याचा प्रयत्न करतो आहे. माझ्या ज्या अनेक काटोलमध्ये सभा झाल्या या सभेतून मी काटोलच्या जनतेला सर्तक करण्याचा प्रयत्न करत होतो की, या प्रकारचं खोटं नाटक किंवा खोट दगडफेक करण्याचा प्रयत्न होणार होता. याचे भाकीत मी माझ्या अनेक भाषणामध्ये केलं होते.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, अशाप्रकारची खोटी दगडफेकी करण्यात आलेली आहे. या सगळ्या गोष्टीचा तपास पोलीस विभाग करणारच आहे. निवडणुका आहेत. म्हणून मी या माध्यमातून काटोलच्या जनतेला सर्तक करण्याकरता हा व्हिडिओ काढलेला आहे. हे नाटक आहे. मागच्या 25 वर्षापासून काटोलच्या जनतेला मूर्ख बनवण्याचे काम करत आहेत.असे परिणय फुके म्हणाले.