ताज्या बातम्या
लवकरच बेस्टमधील कागदी तिकीट बंद होणार
बेस्टमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी बातमी म्हणजे लवकरच बेस्टमधील कागदी तिकीट बंद होणार आहेत.
बेस्टमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी बातमी म्हणजे लवकरच बेस्टमधील कागदी तिकीट बंद होणार आहेत. प्रवाशांना मोबाईलमध्ये ऑनलाईन तिकीट दिले जाणार आहे. यामुळे कुठलेही वेगळे कार्ड वापरावे लागणार नाही. मोबाईल ॲपच्या माध्यमातून हे तिकीट मिळणार आहे.
'बेस्ट 'चा तिकिटाच्या कागदावर होणार वर्षाचा अडीच कोटींचा खर्चही वाचणार असल्याची माहिती 'बेस्ट'चे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली आहे. 'चलो ॲप' मुळे ग्राहकांना ऑनलाईन पैसे भरून तिकीट मिळत आहे.
यामुळे आता कागदी तिकीट बंद होणार असून 'बेस्ट 'चा तिकिटाच्या कागदावर होणारा खर्चही वाचणार आहे.