आता पडणार नाही, चारित्र्यहिन असेल त्याला पाडणार पंकजा मुंडेंचा रोख कुणाकडे?
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान गडावर पार पडत आहे. या मेळाव्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. यावेळी बोलताना तुम्ही जिंकण्यासाठी काही करू शकता पण जिंकण्यासाठी निष्ठा गहान ठेवू शकत नाहीत नीतिमत्ता गहाण ठेवू शकत नाही असं पंकजा मुंडे म्हणाले आहेत.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, सकाळी मोहन भागवत यांनी सांगितलं की नीतिमत्ता ठेवून राजकारण करा नीतिमत्ता बाजूला ठेवून राजकारण करणे हे देशाच्या हिताचे नाही त्यामुळे वाघ आणि सिंह मिळून एक प्राणी बनतो त्याला म्हणतात लायगर. पण बकरी आणि सिंहाचा पछाडा तयार करता येत नाही त्यामुळे निसर्गाचे काही नियम आहेत पण तुम्ही जिंकण्यासाठी काही करू शकता पण जिंकण्यासाठी निष्ठा गहान ठेवू शकत नाहीत नीतिमत्ता गहाण ठेवू शकत नाही. असं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, आता पडणार नाही, चारित्र्यहिन असेल त्याला पाडणार, शेतकऱ्यांचं हित पाहणार नाही त्याला पाडणार, असं म्हणत अप्रत्यक्ष टोला पंकजा मुंडे यांनी मारला आहे.