Pankaja Munde : भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा; काय बोलणार याकडे लक्ष

Pankaja Munde : भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा; काय बोलणार याकडे लक्ष

बीडच्या सावरगावात पंकजा मुंडे यांचा आज दसरा मेळावा असणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विकास माने, बीड

बीडच्या सावरगावात पंकजा मुंडे यांचा आज दसरा मेळावा असणार आहे. दसरा मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यंदा पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात दोन दसरा मिळावे होत असल्याने विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

पंकजा मुंडेंच्या व्यासपीठ परिसरात विशेष 15 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच 200हून अधिक पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.

जिल्ह्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पाहायला मिळत असल्याचे या मेळाव्यावर पोलिसांची करडी नजर असणार आहे. आज होणाऱ्या दसरा मेळाव्याची सावरगाव घाट येथील तयारी पूर्ण झाली आहे.

सावरगावच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे या कोणत्या मुद्यावर भाष्य करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com