Pankaja Munde Dasara Melava ; दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडेंचा इशारा कोणाला?
दसऱ्यानिमित्त आज बीडमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यास तब्बल १२ वर्षांनतर आवर्जून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील हजेरी लावली. तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही या मेळाव्याला उपस्थिती लावली. यावरुनच लक्ष्मण हाके म्हणजे गोंडस लेकरासारखे दिसतात. त्यांनी स्वत:हून इकडे येण्याचा निर्णय घेतला. माझ्या दसऱ्याला मी कोणालाही निमंत्रण देत नाही. पण लक्ष्मण हाके याठिकाणी आल्यानंतर त्यांनी भगवान बाबा आणि मुंडे साहेबांच्या स्मृतीला वंदन केले. मी याठिकाणी हाकेंचे स्वागत करते, असं त्या म्हणाल्या.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी “मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हू” अशी हिंदीतून कविता म्हणत भाषणाला सुरुवात केली. यानंतर उपस्थित जनसमुदायाला त्यांनीही संबोधित केले.
या मेळाव्याला 18 पघड जातीचे लोक आलेत का नाही. आता कुठून आले आहेत. सर्व महाराष्ट्र भरातून या मेळाव्याला लोक आले आहेत. सर्वांना मंचावर आल्यावर मी दंडवत घालते. आम्ही महाराष्ट्रात सर्वांना भेटण्यासाठी येणार आहे. आता मतदान केल्याशिवाय जाऊ नका रे बाबांनो!
माझ्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा या लोकांनी जीव दिला. त्यामुळे इथल्या लोकांवर मी पोटच्या लेकरापेक्षा जास्त जीव लावते आणि आई वडिलांपेक्षा जास्त तुम्ही माझ्यावर प्रेमा करता. या मेळाव्याला माझे बंधू महादेव जानकर, गोंडस लेकरू लक्ष्मण हाके यांनी काल मला व्हिडिओ पाठवला आणि म्हणाले दसरा मेळाव्याला मी येतो,ते माझा सन्मान ठेवून आले त्याबद्दल त्यांचे आभार मानते, अस त्या म्हणाल्या.
या मेळाव्याला १८ पगड जातीचे लोक आले आहेत. नाशिक आहिल्यानगर, बुलढाणा, गंगाखेड, जिंतूर परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, पुणे, पिंपरी चिंचवड याठिकाणाहून लोक आले आहेत. मी दरवर्षी तुम्हाला साष्टांग दंडवत घालते. कारण माझ्या बापाने मरताना माझ्या झोळीत तुमची जबाबदारी टाकली आहे. तुम्ही मला जिंकवलं, मला इज्जत दिली. माझा पराभव झाल्यावर सर्वात अधिक इज्जत दिली. आता मी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात दौऱ्याला येणार आहे. आपल्याला आपला डाव खेळायचा आहे.परळीतून आम्ही धनु भाऊला तर निवडून देणारच आहोत. पण आता सगळीकडे मी येणार आहे. आमच्या लोकांना त्रास दिल्यास त्याचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही” असा इशाराही यावेळी पंकजा मुंडे यांनी दिला.