Palghar Rain
Palghar RainTeam Lokshahi

Palghar Rain : मागील सहा दिवसांपासून पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

पालघर जिल्ह्यात गेल्या आठवडा भरापासून पावसाने हाहाकार माजवला आहे.
Published by :
shweta walge
Published on

प्रविण बाबरे,पालघर : पालघर जिल्ह्यात गेल्या आठवडा भरापासून पावसाने हाहाकार माजवला असून पावसाचा जोर अजून ही कायम आहे. पालघर जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात वारा आणि पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यात ठीक ठिकाणी विजेच्या खांबांवर झाड पडून वीजपुरवठाही खंडित झाला आहे.

धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाचं सर्वात मोठं धरण असेल्या धामणी धरणाच्या पाणी साठ्यात कमालीची वाढ झाल्याने धरण हे दुथडी भरून वाहू लागले आहे. त्यामुळे नद्यांनाही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात असलेले नदी नाले हे ओसंडून वाहू लागल्याने भात शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे. तर समुद्राला भरती येत असल्याने पश्चिम किनारपट्टी वर मोठ्या प्रमाणात लाटा किनाऱ्यावर उसळत असल्याचे पाहायला मिळत आहेत.

Palghar Rain
Heavy Rain : थर्माकोलच्या होडीवर बसून 7 किलोमीटरचे अंतर कापत वराने गाठले लग्नमंडप

शहरी तसेच ग्रामीण भागातील अनेक सखल भागात पुल, रस्त्यावर पाणी साठून वाहतूक विस्कळित झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com