Rajendra Gavit : पालघर लोकसभेची उमेदवारी मला नाकारली गेली,त्यामुळे माझ्या दृष्टीने एक दु:खद घटना असं म्हणायला हरकत नाही
पालघरमधून शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी नाकारली असून भाजपाचे हेमंत सावरा यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे. तिकीट कापल्यामुळे राजेंद्र गावित नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर राजेंद्र गावित यांनी माध्यमांशी संवाद साधला. राजेंद्र गावित म्हणाले की, पालघर लोकसभेची उमेदवारी ही या ठिकाणी मला या ठिकाणी नाकारली गेली आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने एक दु:खद घटना असं म्हणायला हरकत नाही. खरं म्हणजे या ठिकाणी महायुतीच्या हायकमांडने त्याठिकाणी असे निर्देश दिलं गेले होते. ज्यावेळी तिकिट वाटप करताना की शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष जरी त्याठिकाणी कुठलही चिन्ह मला मिळालं तरी त्या चिन्हावरती दोन्ही पक्षांमधली जी उमेदवारी आहे त्या ठिकाणी उमेदवारी ही मलाच मिळेल अशाप्रकारे मला त्याठिकाणी सूचित करण्यात आलं.
त्यासंदर्भामध्ये तसे मला त्याठिकाणी काम करायला देखील सांगितले गेले. माझी त्या ठिकाणी एक फेरी झाली. असं असताना त्याठिकाणी तिकिट नाकारलं गेलं. परिणामस्वरुप त्या ठिकाणी माझे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये अत्यंत नैराश्य, असंतोष हा मोठा प्रमाणात त्या कार्यकर्त्यांमध्ये आढळून आला. असे राजेंद्र गावित म्हणाले.